1 JUN 2017 MADHAV BHANDARI ON FARMERS
शेतकरी संपातून काहीही साध्य होणार नाही: माधव भंडारी
शेतक-यांनी संप केला तर सरकारला काहीही फरक पडणार नाही’, अशी मुक्ताफळे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी उधळली.
पंढरपूर- ‘कोणत्याही शेतक-यांना संप करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. संपामुळे शेतक-यांचेच नुकसान होणार आहे. तरीही शेतक-यांनी संप केला तर सरकारला काहीही फरक पडणार नाही’, अशी मुक्ताफळे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी उधळली.
दरम्यान ते म्हणाले की, “शेतक-यांना संपावर जाण्यासाठी जे लोक चिथावणी देत आहेत ते शेतक-यांचे नुकसान करत आहेत. संपावर जाऊन शेतकरी काही साध्य करू शकत नाही. उलट त्याचा पेरण्यांचा दहा दिवसांचा हंगाम गेला तर त्याचे पुढचे संपूर्ण वर्ष वाया जाणार आहे. या पद्धतीने शेतकरी उद्ध्वस्त होईल. त्यामुळे अशा चिथावणीला शेतक-यांनी बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
खासगी कामाच्या निमित्ताने भंडारी पंढरपुरात आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शेतक-यांविषयी ही भाषा वापरली. तसेच शेतक-यांच्या संपामुळे अन्नधान्य कमी पडले तर आयात करू किंवा पर्यायी व्यवस्था निर्माण करू, असेही वक्तव्य केले.
भंडारी म्हणाले, विरोधी पक्षांनी यापूर्वी संघर्ष यात्रा काढली होती. त्यांच्या संघर्ष यात्रेला किती शेतक-यांनी पाठिंबा दिला, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यानंतर आमदार बच्चू कडूंनीही सरकारच्या विरोधात आसूड यात्रा काढली. आता खासदार राजू शेट्टी यांची आत्मक्लेष यात्रा सुरू आहे. अशा यात्रांमुळे सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही. अशा यात्रा काढून शेतक-यांची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे. खासदार शेट्टींचे काय दुखणे आहे, हे अजून तरी आम्हाला कळले नाही, असेही भंडारी म्हणाले.
माधव भंडारींचे वक्तव्ये म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी- सावंत
भारतीय जनता पक्ष आणि सरकारला अन्नदात्याची गरज नाही हे भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. भाजपकडून केली जाणारी अशी वक्तव्ये म्हणजे विनाशकाले विपरीत बुध्दी आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
‘‘शेतकरी संपावर गेले तरी काही बिघडत नाही. अन्न धान्य आयात करून गरज भागवू, संपामुळे शेतक-यांचाच तोटा होईल, सरकारला काही फरक पडत नाही.’’असे म्हणणे म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. राज्यभरातले शेतकरी बेमुदत संपावर जात आहेत. इतिहासात कधी नव्हे ते अन्नदात्यावर, अशी पाळी आली आहे. भाजपाला नसेल मात्र देशातील आणि राज्यातील जनतेला बळीराजाची गरज आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा बळीराजाचाच आहे.
भाजपाने काढलेल्या शिवार संवाद यात्रेला शेतक-यांचा विरोध सातत्याने वाढताना दिसत आहे. त्यावर साले, चालते व्हा अशा त-हेची विधाने तर भाजप नेते करीतच आहेत. परंतु शेतक-यांकडून पायही धुऊन घेत आहेत.
भाजपचा विनाशकाळ जवळ आल्याचे यावरून दिसून येते. आगामी काळात राज्यातले आणि देशातले शेतकरीही भाजपाची गरज नाही हे दाखवून देतील असे सावंत म्हणाले. काँग्रेस पक्ष भाजपच्या विधानांचा आणि शेतक-यांबद्दलच्या अनास्थेचा निषेध करीत आहे, असे सावंत यांनी सांगितले.
- ध्यास सामाजिक समतेचा!
- कपिल मिश्रा यांना चोपले
Search Results
Shetkari Samp 1 June 2017 farmers strike - YouTube
https://www.youtube.com/watch?v=T_1wFnATBfw
1 hour ago - Uploaded by Tal Junnar Dist Pune Maharashtra
Please try again later. Published on Jun 1, 2017. शेतकरी संप आळेफाटा , shetkarisamp alephata 1 june 2017 दूध टँकर ...Sharad Pawar worried on Farmer's strike | - ABP Majha - ABP News
abpmajha.abplive.in › videos
Shetkari samp 1 june | 12000 लिटर दूध दिले रस्त्यावर ओतून ...
https://www.youtube.com/watch?v=cWEIbaC1Jms
9 hours ago - Uploaded by SW G
Farmers on strike, Shetkari samp 1 june, parinam, Nashik market thapp ...Shetkari samp 1 june | 12000 ...Puntamba : Farmers on strike : Reaction of farmers ... - ABP Majha
abpmajha.abplive.in › videos
LIVE UPDATE : State farmers on strike | - ABP Majha - ABP News
abpmajha.abplive.in › maharashtra
१ जून २०१७ पासून होणार्या शेतकरी संपामध्ये.. शेतकरी ...
https://www.youtube.com/watch?v=s0OitBfHrEY
May 22, 2017 - Uploaded by Pune Metro
punemetro A.nagar 1 जून २०१७ पासून होणार्या शेतकरी संपामध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी ...शेतकरी संघटना सक्रीय सहभागी होणार-घनवट ... Published on ...LIVE Tv - IBN Lokmat
www.ibnlokmat.tv/live-tv/
You visited this page on 31/5/17.
Madha : Solapur : Farmers poured milk on streets | - ABP Majha - ABP ...
abpmajha.abplive.in › videos
Manmad : Lasalgaon : Milk on roads : update @8am 01:06:2017 |
abpmajha.abplive.in › videos
शेतकरी संपावर: नाशिक, मनमानड, संगमनेर बाजार...
abpmajha.abplive.in › videos
Stay up to date on results for shetkari andolan 0n 1 june 2017.
Create alert