Thursday 1 June 2017

1 JUN 2017 FARMERS STRIKE


LIVE: शेतकरी संपावर.. भाजीपाला, फळे रस्त्यावर फेकले; शेतकर्‍यांनी वेठीस धरण्यापेक्षा चर्चा करावी- सीएम

दिव्य मराठी वेब टीम | Jun 01, 2017, 19:04 PM IST
राज्यात शेतकर्‍यांनी संप पुकारला आहे. संप जास्त काळ चालू ठेवणे शेतकर्‍यांच्या हिताचे नाही, यामध्ये त्यांचेच नुकसान होत आहे. स्वामीनाथन आयोग लागू केल्यास किती फायदा होईल याचा विचार करणे गरजेचे आहे. पली उत्पादन क्षमता कमी असल्याने आयोग लागू करणे सोपे नाही. शेतकर्‍यांनी वेठीस धरण्यापेक्षा चर्चा करावी, मार्ग काढावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्याप्रमाणे शेतकर्‍यांच्या संपात काही पक्ष आपले हात धूत असल्याचा आरोपही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला.

आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री? काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकर्‍यांच्या आडून 'दूध' गंगेत हात धूत आहेत

संपूर्ण कर्ज माफी, मोफत वीज, दूधाला 50 रुपये भाव, शेतकऱ्यांना पेन्शन यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील शेतकरी आजपासून (1 जून) संपावर गेला आहे. शेतकऱ्यांच्या या ऐतिहासिक संपाला पहिले गालबोट साताऱ्यात लागले असून मुंबईकडे जाणारे दूधाचे टँकर फोडण्यात आले आहे. औरंगाबादच्या अडत बाजारात मात्र गुरुवारी पाहाटे खरेदी-विक्री सुरु होती. विदर्भातील शेतकरीही या संपात सहभागी आहेत.

LIVE UPDATE
- पुणे - शरद पवार म्हणाले, आज मी अस्वस्थ आहे... मार्केट यार्डात आज 40% आवक घटली, भाजीपाला दर 15 ते 20% वाढले आहे.
- नाशिक- हिंसक वळण... कोपरगावमध्ये संतप्त शेतकर्‍यांनी गाडी पेटवली...भाजप नेते माधव भंडारींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन.
उत्तर सोलापूरातही संपाचे पडसाद, माहामार्गावर दूध ओतून शासनाचा निषेध
-
शेतकरी संपामुळे कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाची आवक घटली
सोलापूर: शेतकरी संपाची पहिली ठिणगी; आक्रमक शेतकऱ्यांना दूध आणि कांदा रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध
- जळगाव : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन
- शिर्डीत शेतकऱ्यांनी धरणीमातेला दुग्धाभिषेक करत पहाटे 4:15 वाजता दुधाचा टँकर फोडला.
-उत्तर महाराष्ट्रात कुठे रस्त्यावर वाहत आहेत दुधाचे पाट तर कुठे आंब्यांचा चिखल
- तळेगाव दिघे येथे शेतकरी व ग्रामस्थांनी दुधाचा टँकर पकडला 25000 लिटर दूध रस्त्यावर सोडले.
- विदर्भात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. मात्र विदर्भात कुठेही शेतीमालाची अडवणूक झाल्याची अद्याप माहिती नाही. मात्र शेतकरी गावागावात ग्रामपंचायतीसमोर येऊन आंदोलन करीत आहेत.
- वर्धा जिल्ह्यात तालूका स्तरावर शेतकरी अंदोलन करीत आहे.
- औरंगाबाद : येथील शेतकऱ्यांनी बाजार बंद करण्याचे आवाहन केल्यानंतर व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना बेदम मारहाण केली.
- नाशिकमधील नैताळे येथे शेतकऱ्यांनी भाजपाला, फळांच्या गाड्या अडवल्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना घेरून लाठीमार केला.
- उस्मानाबाद: पाथरुड आणि कसबे तडवळ्यात दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांनी शासनाचा निषेध केला.
- अहमदनगर: साकेत खुर्द येथे शेतकऱ्यांनी हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून दिले. यामुळे नगर-सोलापूर महामार्ग काळीवेळासाठी ठप्प झाला होता.
-सोलापूर: मोहोळ तालुक्यातील मसले चौधरीत शेतकऱ्यांनी ओतले रस्त्यावर दूध.
- नाशिक, मनमाडला बाजार समित्या बंद, व्यवहार ठप्प.
- नाशिक : येवल्याजवळील टोल नाक्यावर भाजीपाल्याचा ट्रक उलटवला.
- अहमदनगर: राहुरी तालुका बाजार समितीला टाळे ठोकून शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन.
-अहमदनगर तालुक्यातील बाबूर्डी बेंद येथे शेतकऱ्यांनी दोन दूध डेअरीचे दूध प्रवाशांना वाटत अनोखे आंदोलन केले.
- अहमदनगर: पारनेर तालुक्यातील निघोजमध्ये शेतकऱ्यांनी दुधाचे टँकर ओतून दिले.
- अहमदनगर: शेतकऱ्यांच्या संपाला संगमनेरमध्ये पाठिंबा, कृषी बाजार समितीत शुकशुकाट आहे.

Next Article



शेतकरी संपाचा नगर शहरातील बाजारपेठेवरही होणार परिणाम, दूध संघाचा संपाला पाठिंबा

Flicker

1 of 75


शेतकरी संपाचा नगर शहरातील बाजारपेठेवरही होणार परिणाम, दूध संघाचा संपाला पाठिंबा

प्रतिनिधी | Jun 01, 2017, 11:36AM IST
  • शेतकरी संपाचा नगर शहरातील बाजारपेठेवरही होणार परिणाम, दूध संघाचा संपाला पाठिंबा
नगर- पुणतांबे येथील शेतकरी जूनपासून संपावर जाणार असल्याने त्याचा शहरातील बाजारपेठेवरही परिणाम होणार आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बुधवारी भाजीबाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन आठवड्यांपूर्वी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी शेतकऱ्यांची चर्चा झाली होती. या चर्चेनंतर संप स्थगित करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पुन्हा शेतकऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. या संपाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या संपाला नगर डिस्ट्रिक्ट फर्टिलायझर्स, सीडस् अॅण्ड पेस्टिसाईडस् डिलर्स असोसिएशनने पाठिंबा दिला आहे. जिल्ह्यातील सर्व कृषिविक्रेतेही शेतकऱ्यांचीच मुले असून, संपूर्ण कृषी व्यवसाय हा शेतकऱ्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे जूनला जिल्ह्यातील सर्व रासायनिक खते, बियाणे, कीटकनाशक विक्रेते दुकाने बंद ठेवून संपाला पाठिंबा देणार आहेत, असे असोसिएशनच्या बैठकीत अध्यक्ष सतीश मुनोत यांनी सांगितले. बैठकीस संघटनेचे सचिव दिलीप कोकणे, राजेश ठोळे, उपाध्यक्ष किशोर नवले, बापूसाहेब भवर, सुनील चोरडिया, सहसचिव हनुमंत सागडे, शरद गरड, रमेश खिलारी, माजी अध्यक्ष संजय बोरा, प्रकाश कवडे, श्रीधर कोलते, अजय बोरा, विवेक कासार, मनोज गुगळे, शरद झंवर, माजी खजिनदार दिलीप गांधी, श्याम राठोड, संचालक छबुराव हराळ, प्रसन्नकुमार, वृषभ गांधी, आबासाहेब भोकरे, ज्ञानेश्वर शिंदे, अशोक दरंदले, रावसाहेब कांकुणे, उपमन्यू शिंदे, पंडितराव होले, योगेश सोनवणे, राहुल निचीत आदी उपस्थित होते.

दूध संकलन केंद्रांनीही संपाला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या संपाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला, तसेच दूध या जीवनावश्यक वस्तूंची वाहने पोलिस संरक्षणात सोडण्यात येणार आहेत.

दूध संकलन केंद्र बंद ठेवणार 
वाघेश्वरीआणिप्रियदर्शनी दूध संघ शेतकरी संपात सहभागी होणार आहेत. या संघांमार्फत चालवली जाणारी सर्व दूध संकलन केंद्र बंद राहणार आहेत. संघामार्फत पुढे देखील दूध पुरवठा होणार नाही. केवळ नगर, आैरंगाबाद, नाशिक बंद होऊन चालणार नाही. राज्याची राजधानी असलेले मुंबई शहर अडवणे गरजेचे आहे.
- दीपक लांडगे, अध्यक्ष, वाघेश्वरी-प्रियदर्शनी दूध संघ.
शेतकऱ्यांच्या संपाला संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा
शेतकऱ्यांच्याप्रश्नावर कोणताही निर्णय होत नसल्याने सरकार नेमके कुणाच्या बाजूने काम करत आहे, हा प्रश्नच आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी जूनपासून पुकारलेल्या संपाला मराठा सेवा संघ, तसेच संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला असल्याची माहिती ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठुबे यांनी दिली.

ब्रिगेड २५ वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करत आहे. स्वामीनाथन् आयोग लागू करावा, अशी ब्रिगेडची मागणी आहे. शेतीमालाला हमी भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मोफत द्यावे, अशा मागण्याही आहेत. त्या पूर्ण होत नसल्याने आम्ही शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत आहोत. त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून उभे राहणार असल्याचे ठुबे यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय कार्यकारिणीचे डॉ. प्रदीप तुपेरे, प्रा. बाळासाहेब पवार, मराठा सेवा संघ महानगर अध्यक्ष अभिजित वाघ, संभाजी बिग्रेड अल्पसंख्याकचे जिल्हाध्यक्ष सिराज खान, अतुल लहारे आदी उपस्थित होते.

Next Article



शंभर खाटांचे कामगार रुग्णालय उभारणार, केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांची घोषणा


शंभर खाटांचे कामगार रुग्णालय उभारणार, केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांची घोषणा

प्रतिनिधी | Jun 01, 2017, 11:34AM IST
  • शंभर खाटांचे कामगार रुग्णालय उभारणार, केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांची घोषणा
जामखेड- जिल्ह्यातील कामगारांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी कामगार विमा योजनेंतर्गत नगरमध्ये शंभर खाटांचे रुग्णालय उभारण्याची घोषणा केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी बुधवारी केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९२ जयंतीनिमित्त जामखेड तालुक्यातील चोंडी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते आमदार गणपतराव देशमुख होते. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, उत्तर प्रदेशचे पशुसंवर्धन मंत्री एस. पी. सिंग बघेल, पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री अण्णा डांगे, ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर, खासदार विकास महात्मे, आमदार रामहरी रूपनवर, रामराव वडकुते, नारायण पाटील, भीमराव धोंडे, शिवाजी कर्डिले मोनिका राजळे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सविता गोल्हार, माजी आमदार पोपटराव गावडे, गोविंद केंद्रे, विजय मोरे, अनंतकुमार पाटील, रमेश शेंडगे, धनगर आरक्षण समितीचे अध्यक्ष हनुमंत सूळ, चिमण डांगे, गोपीचंद पडळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत मोरे, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती राजश्री मोरे, रवी सुरवसे, सोमनाथ पाचारणे, डॉ. शिवाजी राऊत, अशोक देवकर, अविनाश शिंदे, पांडुरंग उबाळे, चोंडीचे सरपंच अभिमन्यू सोनवणे, अप्पासाहेब उबाळे, विलास जगदाळे आदी कार्यक्रमास उपस्थित होते.

बंडारू दत्तात्रय म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांचे जन्मगाव असलेल्या चोंडीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. अहिल्यादेवींचे जीवनचरित्र संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होणे गरजेचे आहे. महिला पुढे आल्या, तरच अहिल्यादेवींच्या विचारांना चालना मिळेल, असे म्हणाले.

विडी कामगारांना घरासाठी पूर्वी केवळ ४० हजार रुपयांची मदत होती. ती आता वाढवून दीड लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. कामगार महिलांसाठी मातृत्व प्रोत्साहन योजनेंतर्गत २६ हप्त्यांपर्यंत वेतन मिळणार अाहे, असे त्यांनी सांगितले.

पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्यात सत्ता परिवर्तनाला केवळ धनगर समाजच कारणीभूत असल्याने या समाजाला दिलेला शब्द आम्ही पाळणार अाहोत. समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हे सरकार याप्रश्री समाजाच्या संपूर्ण पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात काढलेल्या संघर्ष यात्रेचा समारोप मी चोंडीत केला. गोपीनाथ मुंडे हे नेहमी जयंतीच्या कार्यक्रमास चोंडीत हजेरी लावत. त्यांचा वारसा मी पुढे चालू ठेवला अाहे, असे त्यांनी सांगितले.

बघेल म्हणाले, धनगर समाजाला यापूर्वीच आरक्षण मिळाले आहे. आता तसे प्रमाणपत्र दिले पाहिजे. त्यासाठी सरकारवर दबाव आणल्याशिवाय पर्याय नाही. अहिल्यादेवी जयंतीच्या माध्यमातून समाज बांधव एकत्र आले, ही बाब महत्त्वाची असल्याचे सांगत धनगर समाजाचा भविष्यकाळ निश्चितच चांगला अाहे, असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात आमदार देशमुख यांनी धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी जोरदार मागणी केली.

कार्यक्रमाआधी मंत्री बंडारू दत्तात्रय बघेल यांनी अहिल्येश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. शिल्पसृष्टी जन्मघर गढीची पाहणी केली. कार्यक्रमानंतर पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रधानमंत्री सडक योजनेंतर्गत जामखेड ते राशीन या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता भगवान गडदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लहुजी शेवाळे यांनी केले.

आरक्षणासाठी दबाव वाढवणार 
प्रास्ताविकातपालकमंत्री राम शिंदे म्हणाले, धनगर समाजाला उशीर करता लवकरात लवकर आरक्षण मिळाले पाहिजे, यासाठी सरकारवर दबाव वाढवावा लागेल. उपस्थितांनी टाळया वाजवून त्यांना पाठिंबा दिला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्मगाव चोंडी हे प्रेरणा देणारे स्थळ आहे. त्यामुळे चोंडीला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली.

आरक्षणासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांचे मौन 
धनगरसमाज आरक्षणासंदर्भात लोकांच्या भावना तीव्र होत्या. या प्रश्राकडे लक्ष वेधण्यासाठी अनेकांनी धनगर आरक्षण लिहिलेल्या टोप्या घातल्या होत्या. मंत्री बंडारू दत्तात्रय यांचे भाषण चालू असताना आरक्षणासंदर्भात घोषणा देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र, बंडारू दत्तात्रय यांनी धनगर समाज आरक्षणसंदर्भात मौन धारण केल्याने समाजबांधवांची निराशा झाली.


शेतकरी संपाला हिंसक वळण; येवल्यात वाहने फोडली, कोपरगावमध्ये जाळपोळ, 144 कलम लावण्याची तयारी

दिव्य मराठी वेब टीम | Jun 01, 2017, 19:10PM IST
नाशिक/ अहमदनगर- जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये शेतकऱ्यांच्या संपाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. या संपला विविध संघटना, कीटकनाशक व बियाणे विक्रेते व जिल्ह्यातील कांद व्यापाऱ्यांनी पाठींबा देत देशातील इतर राज्यासह विदेशात कांदा न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावजवळ शेतकर्‍यांच्या संपाला हिंसक वळण लागले आहे. दुसरीकडे निफाडजवळ रस्त्यावर उतरलेल्या शेतकर्‍यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. येवल्यात गाड्यांची तोडफोड, पोलिसांकडून लाठीमार, अश्रुधूराचा वापर, प्रशासनाने 144 कलम लावण्याची तयारी केल्याची माहिती मिळाली आहे.

लासलगाव: पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन..
लासलगाव येथे रस्त्यावर उतरलेल्या आंदोलक शेतकर्‍यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकर्‍यांना सोडा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी लासलगाव पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले आहे. सकाळपासून शेतकरी ठिय्या देऊन बसले आहेत.
बुधवारी मध्यरात्री शेतकरी संपसाठी गाड्या अडवत होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.


LIVE UPDATES...
- नाशिकमधील नैताळे येथे शेतकऱ्यांनी फळांच्या गाड्या अडवल्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना घेरून लाठीमार केला.
- देवळा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथे भाजीपाल्याचा ट्रक अडवून परत पाठविण्यात आला आहे.
- नाशिक, मनमाडला बाजार समित्या बंद, व्यवहार ठप्प.
- नाशिक : येवल्याजवळील टोल नाक्यावर भाजीपाल्याचा ट्रक उलटवला.
- शिर्डीत शेतकऱ्यांनी धरणीमातेला दुग्धाभिषेक करत पहाटे 4:15 वाजता दुधाचा टँकर फोडला.
- अहमदनगर: राहुरी तालुका बाजार समितीला टाळे ठोकून शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन.
- अहमदनगर तालुक्यातील बाबूर्डि बेंद येथे शेतकऱ्यांनी दोन दुध डेअरीचे दूध प्रवाशांना वाटत अनोखे अंदोलन केले.
- अहमदनगर: पारनेर तालुक्यातील निघोजमध्ये शेतकऱ्यांनी दुधाचे टँकर ओतून दिले.
- अहमदनगर: शेतकऱ्यांच्या संपाला संगमनेरमध्ये पाठिंबा, कृषी बाजार समितीत शुकशुकाट आहे.

राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनात शेतकर्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश शिवारात टोलनाक्याजवळ शेतकरी आक्रमक झाले आहेत. कोपरगावजवळ संतप्त शेतकऱ्यांनी गाडीला आग लावली आहे. दूध, भाजीपाला तसेच फळे बाजारात जाऊ न द्यायची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. दहेगाव येथे रस्त्यावर डाळिंबे फेकली. शेतकर्‍यांनी मालवाहू वाहने अडवून माल रस्त्यावर फेकला. इतकेच नाही तर वाहनांची तोडफोडही केली. दुसरीकडे, चांदवडमध्ये भाजप नेते माधव भंडारींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

नाशिक तालुक्यात ठिकठिकाणचे आठवडे बाजार ही बंद ठेवण्यात आले आहेत. संपाच्या पहिल्याच दिवशी शेती पूरक व्यवसायिकांनी स्वत: होऊन आपले सर्व व्यवसाय बंद ठेवल्याने गावागावात शुकशुकाट आहे.
राज्य राखीव दलाच्या तुकड्यांनी शेतकऱ्यांना मारहाण..
नाशिक-औरंगाबाद महामार्गावर दूध आणि भाजीपाल्याचे गाडी अडवणाऱ्या आठ शेतकऱ्यांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध, भाजीपाला फेकल्याने रात्री तीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी हि कारवाई केल्याचे समजते. राज्य राखीव दलाच्या तुकड्यांनी शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

कायम वर्दळ असणाऱ्या बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट..
नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्येही सकाळपासून कोणीही फिरकले नसून शेतकरी संपामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या ठप्प झाल्या आहे. नियमित वर्दळ असणाऱ्या बाजारसमित्यांमध्ये कमालीचा शुकशुकाट आहे.

नाशिकच्या गिरणारे, निफाड तालुक्यातील नैताळे गावात शेतकऱ्यांनी शेतमाल, कांदा, डाळिंब, भाजीपाला वाहतूक करणारे वाहने अडवून शेतमाल रस्त्यावर फेकला. ठिकठिकाणी सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

धुळ्यात रास्तारोको...
धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही मुंबई-आग्रा महामार्गावरील शेतमालाची वाहतूक थांबवली आहे. नाशिक, मुंबई, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद शहरांकडे जाणारा भाजीपाला, दूध, कडधान्य पुरवठा यामुळे खंडीत झाला आहे. कृषी उत्पादन असलेली सर्व वाहन आंदोलक शेतकरी परत पाठवत आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून व्हिडिओ आणि फोटोजमधून जाणून घ्या राज्यभरातील परिस्थिती... 

Next Article



पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी जूनला रोजगार मेळावा


About 415 results (0.40 seconds) 
Tip: Search for English results only. You can specify your search language in Preferences
Stay up to date on results for shetkari andolan 0n 1 june 2017.
Create alert
Help Send feedback Privacy TermsAbout 4,670 results (0.64 seconds) 
Dahanu, Maharashtra - From your search history - Use precise location
 - Learn more   



















No comments:

Post a Comment